शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते वेंगुर्ल्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन.

शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते वेंगुर्ल्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन.

वेंगुर्ला 

   सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला मध्ये शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी नवाबाग येथील मच्छिमार बांधवांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.शहर विकसित होत असून आणखी पर्यटनदृष्ट्या ही विकसित होण्यासाठी आपले प्रयत्न आहेत. शहरातील विकास कामासाठी भरीव निधी दिला असून महिलांनाही रोजगार उपलब्ध करून द्यावयाचा आहे. शहराच्या सर्वांगीण  विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, मात्र विकास असेल तिथे राजकारण नको हे लक्षात ठेवलं पाहिजे असे प्रतिपादन  विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री केसरकर 
करताना दिसले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी करताना मंत्री केसरकर यांच्या माध्यमातून वेंगुर्ले शहरात होत असलेल्या विकास कामांची माहिती देताना आपण सर्वांनी केसरकर यांच्या सोबत राहूया असे सांगितले. कार्यक्रमात आभार तालुका प्रमुख नितीन मांजरेकर यांनी मानले.
         यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर,वेंगुर्ले माजी नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप,भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, शिवसेना तालुकाध्यक्ष नितीन मांजरेकर, शहरप्रमुख उमेश येरम, उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर,जिल्हा संघटक सुनील डुबळे, युवक शहर अध्यक्ष संतोष परब, तालुका संघटक बाळा दळवी, सावंतवाडी खरेदी विक्री संघ व्हाईस चेअरमन राजेंद्र रेडकर, कोचरे सरपंच योगेश तेली, मितेश परब,माजी प. स. सदस्य समाधान बादवलकर, निलेश खडपकर, आनंद वेंगुर्लेकर,रेडकर, मोजेस, मुख्याधिकारी पारितोष कंकाळ, प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल,पोलीस निरीक्षक संदीप भोसले, वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे उद्यानविद्यावेत्ता डॉ. महेंद्र गवाणकर, माजी नगरसेवक नागेश गावडे, भाजप महिला तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ,वृंदा गवंडळकर,प्रार्थना हळदणकर आदींसह वेंगुर्ले, सावंतवाडी तालुक्यातील शिवसेना,भाजप पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.