श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे ११ मे रोजी आंबा महोत्सव
देवगड
श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे सोमवार, दि. ११ मे २०२६ रोजी प्रतिवर्षाप्रमाणे आंबा महोत्सव उत्साहात साजरा होणार आहे. या महोत्सवात परिसरात हापूस आंब्यांची आकर्षक सजावट करण्यात येणार असून भाविकांना विशेष आकर्षण पाहायला मिळणार आहे. यानिमित्त सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.मंदिर गाभारा व परिसरात हापूस आंब्यांची देखणी सजावट केली जाणार असून विविध जातींच्या आंबा फळांचे प्रदर्शन व विक्रीही आयोजित करण्यात आली आहे. तसेच आंब्यापासून बनविलेल्या विविध पदार्थांची चव घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यासोबतच आंब्यांच्या विविध जातींची रोपेही विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत.महोत्सवानिमित्त मंदिर परिसरात रविवार, दि. १० मे ते मंगळवार, दि. १२ मे २०२६ या कालावधीत विविध स्टॉल उपलब्ध राहणार आहेत. इच्छुक विक्रेत्यांनी गुरुवार, दि. ०७ मे २०२६ पर्यंत स्टॉल बुकिंग करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.गावातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी मंदिर सजावटीसाठी स्वेच्छेने आंबा देऊन सहकार्य करावे, अशी विनंती श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट, कुणकेश्वर यांनी केली आहे.अधिक माहितीसाठी संपर्क: 7700997575/ 8788117171/8308372550
मु. पो. कुणकेश्वर, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग (महाराष्ट्र)
konkansamwad 
