पूरस्थितीमुळे कुडाळ तालुक्यात झालेल्या नुकसानीची आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी. एन.डी.आर.एफ.च्या टीम समवेत पूरग्रस्त भागात दिली भेट.
कुडाळ.
अतिवृष्टीमुळे कुडाळ तालुक्यात रविवारी ठिकठिकाणी पूरस्थिती उद्भवल्याने नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरून त्यांचे मोठे नुकसान झाले.पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे शेतीचे देखील नुकसान झाले.आज पुन्हा आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ तालुक्यात विविध ठिकाणी भेट देऊन नागरिकांच्या नुकसानीची पाहणी केली. पंचनाम्याचा आढावा घेतला.काही ठिकाणी पंचनामे झाले नाहीत त्या ठिकाणी तलाठ्यांना पंचनाम्याच्या सूचना दिल्या.
आपत्ती ग्रस्त नागरिकांना तातडीने मदतकार्य करण्यात जिल्ह्याची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कमी पडल्याने आमदार वैभव नाईक काल आक्रमक झाले होते. जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना त्याचा जाब विचारण्यात आला होता. त्यानंतर प्रशासनाकडून आज एन. डी.आर. एफ. ची टीम कुडाळ येथे पाठविण्यात आली. एन.डी. आर. एफ. च्या टीमसोबत आमदार वैभव नाईक यांनी पावशी, हुमरमळा, डिगस, कसाल यांसह पूरस्थिती उध्दभवलेल्या भागात पाहणी केली. तसेच आपत्ती ग्रस्त नागरिकांना मदतकार्य करण्यात आले. त्यांची विचारपूस करण्यात आली.यावेळी संजय पडते, अमरसेन सावंत, बबन बोभाटे,बाळा कोरगावकर, राजू कविटकर, अजित परब, अतुल बंगे, कौशल जोशी, सचिन काळप, उदय मांजरेकर, अमित राणे, गुरु गडकर, गोट्या चव्हाण आदी उपस्थित होते.