पत्रकार सुरेश कौलगेकर यांना मातृशोक.

पत्रकार सुरेश कौलगेकर यांना मातृशोक.

वेंगुर्ला.

  बॅ. खर्डेकर रोड येथील रहिवासी शांताबाई बाबूराव कौलगेकर (९९) यांचे मंगळवार १३ रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.
  त्यांच्या पश्चात विवाहित मुलगा, दोन सुना, विवाहित मुलगी, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा श्रमिक पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष, पत्रकार सुरेश कौलगेकर यांच्या त्या आई होत.