कालव्याची सुरक्षितता राखत सफाई करा....जावेद खतीब, बाळू सावंत यांची प्रशासनाकडे मागणी
बांदा
तिलारी प्रकल्पाच्या बांदा शाखा कालव्यातील झुडपे काढण्याच्या कामाला नेतर्डे येथील खोलबागवाडीपासून सुरुवात झाली असून मशीनद्वारे साफसफाई केली जात आहे. माजी उपसरपंच जावेद खतीब आणि राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी या कामासाठी केलेल्या पाठपुराव्यानंतर कालवा विभागाने ही कार्यवाही सुरू केली. कामाची प्रत्यक्ष पाहणी करताना त्यांनी कालवा विभागाचे सहाय्यक अभियंता अजित पाटील व ठेकेदारांशी संवाद साधून सफाईदरम्यान कालव्याच्या मूळ बांधकामाला कोणताही धक्का पोहोचू नये, याची दक्षता घेण्यासोबतच काम वेगाने पूर्ण करण्यासाठी अधिक मनुष्यबळ नेमण्याची मागणी केली. कालव्याचा पट्टा मोठा असल्याने पाणी सोडण्यापूर्वी कमी कालावधीत हे काम युद्धपातळीवर आटोपून लवकरात लवकर पाणी सोडण्यात यावे, अशी शेतकरी व बागायतदारांची जोरदार मागणी आहे.
konkansamwad 
