मनसे मालवण तालुका अध्यक्षपदी युवा उद्योजक प्रितम गावडे तर उपाध्यक्षपदी पास्कोल रॉड्रिग्ज.

मालवण.
मनसे मालवण तालुकाध्यक्षपदी युवा उद्योजक प्रितम गावड़े, तर तालुका उपाध्यक्षपदी देवबाग ग्रामपंचायत सदस्य पास्कोल रॉड्रिग्ज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सहीने नियुक्तीपत्र पाठविण्यात आले आहे. मराठी बांधव-भगिनींना आणि मातांना अभिमान वाटेल, असे कार्य आपल्या सर्वांच्या हातून घडो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो व आपणा सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो, असे ठाकरे यांनी पदाधिकारी नियुक्तीपत्रात म्हटले आहे. प्रितम व पास्कोल हे दोघेही मनसेच्या माध्यमातून कार्यकर्ता म्हणून कार्यरत असताना सातत्याने सामाजिक कार्यात जोडले गेले आहेत. ते विविध उपक्रम राबवित आहेत. देवबागात ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत असताना पास्कोल यांनी अनेक समाजोपयोगी कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत, राज ठाकरे यांनी त्यांची पदाधिकारी म्हणून नियुक्ती करत तालुक्याची जबाबदारी सोपविली आहे.