खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बांदा भाजपतर्फे विविध उपक्रम

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बांदा भाजपतर्फे विविध उपक्रम

 

बांदा 


     सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार व माजी मुख्यमंत्री श्री. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी बांदा शहराच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.‘दादांना’ दीर्घायुष्य लाभावे यासाठी श्री देव बांदेश्वर मंदिरात श्रीचरणी अभिषेक करण्यात आला. तसेच बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. प्रा. आरोग्य केंद्राला बेडशीट व पिलो कव्हरही भेट देण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, महिला जिल्हा अध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर, बांदा मंडळ अध्यक्ष मधु देसाई, उपसरपंच रत्नाकर आगलावे, माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य जावेद खतीब, बाळू सावंत, दीपक सावंत, गुरु सावंत, बाबा काणेकर, साई धारगळकर, सुनील धामापूरकर, राकेश केसरकर, गुरु धारगळकर, राजा सावंत, विकी कदम, निलेश कदम, युवक अध्यक्ष साई सावंत, डेगवे उपसरपंच प्रवीण देसाई, स्वप्नील सावंत, विनेश गवस, सुरेश गावडे आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.खासदार राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा कार्यातून शुभेच्छा देण्याचा संकल्प बांदा भाजपने केला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.