आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन.

आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन.

सिंधुदुर्ग.

    केंद्र शासन पुरस्कृत आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत दि. 16 ते 31 ऑगस्ट 2023 या कालावधीत कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेचा प्रचार व प्रसार आणि लाभार्थी नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. कृषी विभाग तसेच सर्व बँक मार्फत या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. लाभार्थी नोंदणी अभियान राबविण्यासाठी तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले, असल्याची माहिती (आत्मा) चे प्रकल्प संचालक बी.बी. नाईकनवरे यानी दिली आहे.
    कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेंतर्गत आतापर्यंत सद्यस्थितीत जिल्ह्यातून एकूण 105 लाभार्थ्यांनी योजनेसाठी सहभाग नोंदविला आहे. 48 लाभार्थ्याचे या योजनेंतर्गत कर्ज प्रकरणाना मंजुरी मिळालेली आहे. या योजनेंचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घेण्यासाठी 16 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2023 या कालावधीत जिल्ह्यामध्ये "लाभार्थी जोडणी अभियान पंधरवडा" राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत जिल्ह्यात कुडाळ, मालवण, कणकवली, देवगड आणि सावंतवाडी येथे तालुकास्तरीय कार्यशाळा दि. 24 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट 2023 दरम्यान आयोजित करण्यात येत आहेत. यामध्ये आत्मा कृषी विभाग तसेच विविध बँकेचे अधिकारी योजनेबाबत माहिती, अर्ज नोंदणी प्रक्रियाबाबत मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील जास्तीत - जास्त लाभार्थ्यांनी या कार्यशाळेस उपस्थित राहून योजनेचा लाभ घ्यावा.
    केंद्र शासनामार्फत कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेंतर्गत काढणी पश्चात व्यवस्थापन सुविधा आणि सामूहिक शेती सुविधा निर्माण करण्यास प्रोत्साहन देवून कृषी पायाभूत सुविधा उभारणे अपेक्षित आहे. यासाठी मध्यम व दीर्घ मुदतीच्या आर्थिक गुंतवणुकीची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे.

  शेतकरी आणि त्यांच्या संस्थाना काढणी पश्चात सुविधा उभारणीसाठी मदत करून बाजार संपर्क वाढविणे, पतपुरवठा करताना आकारण्यात येणाऱ्या व्याज दरात या योजनेत सवलत देवून पतपुरवठा करणाऱ्या
 बँकाची जोखीम कमी करण्यासाठी पत हमी या योजनेतून दिली जाईल. एकूणच शेतकरी, बँक व ग्राहक यांचे परस्पर हिताचे वातावरण तयार करून शेतकर्यांच्या निव्वळ उत्पादनात वाढ करणे हा या योजनेचे मुख्य उदिष्ट आहे. या योजनेमध्ये ज्या प्रकल्पांना कर्ज वितरण 8 जुलै 2020 किंवा त्यानंतर झाले असेल असे प्रकल्प व्याज दर सवलतीस पात्र असतील.

योजनेचा कालावधी - 13 वर्ष (सन 2020-21 ते 2032-33)

पात्र लाभार्थी:- प्राथमिक कृषी पतसंस्था, विपणन सहकारी सस्था, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयं-सहायता गट, वैयक्तिक शेतकरी, बहु उदेशीय सहकारी संस्था, संयुक्त उत्तरदायित्व गट, कृषी उद्योजक कृषी उत्पन्न बाजार समिती, वखार महामंडळ, कृषी स्टार्ट अप, केंद्रीय/राज्य यंत्रणा अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेने प्रस्तावित केलेले सार्वजनिक/खाजगी भागीदारी प्रकल्प इ.

AIF योजनेचा लाभ काय आहे-

 १. व्याज सवलत, एकूण 2 कोटी च्या कर्जावर 3 टक्के व्याज सवलत अधिकतम 7 वर्षापर्यंत.

२. पत हमी, लघु उदयोगासाठी पत हमी निधी संस्थेकडून (CGTMSE) रु. 2 कोटी पर्यंतच्या कर्जाला पत हमी देणेत येईल.

 पात्र प्रकल्प-

काढणी पश्चात व्यवस्थापन आणि प्राथमिक प्रक्रिया प्रकल्प- गोदाम, पॅंक हाउस, प्राथमिक प्रक्रिया सुविधा,  रायपनिंग चेंबर, शीत साखळी, फळ पिकविणे, सायलो, प्रतवारी सुविधा,  गुणवत्ता सुधार सुविधा, वाहतूक व्यवस्थापन सुविधा, सामुहिक शेती सुविधा, सेंद्रिय / जैविक निविष्ठा उत्पादन केंद्र,  पुरवठा साखळी सुविधा, काटेकोर शेतीसाठी सुविधा, लॉजीस्टीक सुविधा.
   अपवादात्मक पात्र प्रकल्प- डाळ मिल, तृणधान्य पीठ तयार करणे, तेल घाणी, काजू प्रोसेसिंग, गुळ आणि गुळाची पावडर तयार करणे.
   नव्याने पात्र प्रकल्पाचा समावेश- नर्सरी, टिशू कल्चर, बीज प्रक्रिया, कस्टम हायरिंग सेंटर फार्म मशिनरी / अवजारे, मध प्रक्रिया. सामुदायिक शेती मालमत्ता तयार करण्यासाठी किंवा काढणी नंतरचे व्यवस्थापन प्रकल्प.
   योजनेची सर्व प्रक्रिया ऑनलाईन असून AIF अंर्तगत व्याज सवलतीसाठी www.agriinfra.dac.gov.in या पोर्टल वर अर्ज करावा व कर्जासाठी बँकेत अर्ज करावा. अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या बँक शाखा, कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा.