सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाच्या राज्य कार्यकारणी उपाध्यक्षपदी भरत चव्हाण यांची निवड 

सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाच्या राज्य कार्यकारणी उपाध्यक्षपदी भरत चव्हाण यांची निवड 

वेंगुर्ला 

 


      भारतीय जनता पक्ष प्रणित सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाच्या राज्य कार्यकारणी उपाध्यक्षपदी सिंधुदुर्ग जिल्हा विभागीय सचिव श्री. भरत सीताराम चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.आटपाडी येथे झालेल्या संघाच्या बैठकीत सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाचे अध्यक्ष तथा भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राज्य सरचिटणीस श्री. सतीश मेटकरी यांच्या उपस्थितीत ही निवड जाहीर करण्यात आली.या निवडीबद्दल दि. 14 जुलै रोजी वेंगुर्ला आगारात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.सत्कार सोहळा या कार्यक्रमाला वेंगुर्ला नगराध्यक्ष श्री. राजन गिरप, उपनगराध्यक्ष श्री. सुहास गवंडळकर, सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ वेंगुर्ला आगार अध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रसन्ना देसाई, वेंगुर्ला आगार व्यवस्थापक श्री. नवज्योत गावडे आणि सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्री. अजित कदम उपस्थित होते.नगराध्यक्ष श्री. गिरप यांच्या हस्ते भरत चव्हाण यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी वेंगुर्ला आगार सचिव श्री. महादेव भगत, श्री. भाऊ सावळ, नगरसेवक रविंद्र शिरसाठ, नगरसेविका गौरी माईणकर तसेच संघाचे इतर पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.भरत चव्हाण यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.