रंग उगवतीचे कवी संमेलनाने उजळणार नव्या पहाटेचे क्षितिज
वेंगुर्ला
आनंदयात्री वाङ्मय मंडळातर्फे 'शब्दांमध्ये सामर्थ्य, काव्यातून संस्कार' या ब्रीदवाक्यानुसार 'रंग उगवतीचे' कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. शनिवार, 4 जुलै 2026 रोजी सायंकाळी 4.30 वाजता बॅ. नाथ पै स्मारक हॉल, कॅम्प येथे हे संमेलन संपन्न होणार आहे.सुप्रसिद्ध कवी शशिकांत तिरोडकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असून प्रमुख उपस्थिती म्हणून सुप्रसिद्ध कवी ॲड. विलास कुवळेकर लाभणार आहेत.आनंदयात्री वाङ्मय मंडळ नेहमीच साहित्य व काव्यात्मक विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवते. त्याचाच एक भाग म्हणून या कवी संमेलनाचे आयोजन केले आहे. 'शब्दांच्या रंगांनी उजळू दे नव्या पहाटेचे क्षितिज...' अशी साद घालत रसिकांना या संमेलनाचा लाभ घेऊन काव्यानंद घेण्याचे आवाहन मंडळाच्या अध्यक्षा वृंदा कांबळी व सचिव डॉ. प्रा. सचिन परुळकर यांनी केले आहे.
कार्यक्रम :
1. दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन
2. मान्यवरांचे स्वागत व परिचय
3. आनंदयात्री वाङ्मय मंडळातील कवींचे स्वरचित काव्यसादरीकरण
4. अध्यक्षीय मनोगत
5. आभार प्रदर्शन
रसिक साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून काव्यरसाचा आनंद घ्यावा, अशी विनंती आयोजकांनी केली आहे.
konkansamwad 
