वेंगुर्ले तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार के. जी. गावडे यांचे निधन

वेंगुर्ले तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार के. जी. गावडे यांचे निधन

वेंगुर्ले


      वेंगुर्ले तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष, गेल्या तीन दशकांहून अधिक काळ पत्रकारितेत कार्यरत असलेले ज्येष्ठ पत्रकार के. जी. गावडे (65) यांचे गोवा-बांबोळी येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी पहाटे 1.15 वाजण्याच्या सुमारास निधन झाले असून त्यांच्या निधनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे, शांत, संयमी, सकारात्मक आणि निष्कलंक पत्रकारितेसाठी के. जी. गावडे यांची विशेष ओळख होती, पत्रकारितेच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी वेंगुर्ले तालुका पत्रकार संघाचे अध्यक्षपद भूषविले होते तसेच जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले होते, त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाची दखल घेत त्यांना शासनाचा तंटामुक्त अभियान स्पर्धेतील पुरस्कार तसेच जिल्हा व तालुका पत्रकार संघांसह विविध संस्थांचे पुरस्कार मिळाले होते, के. जी. गावडे यांच्या निधनाचे वृत्त समजताच पत्रकारिता क्षेत्रासह शासकीय, निमशासकीय, विविध संस्था-मंडळे, सहकारी संस्था आणि मित्रपरिवारातून शोक व्यक्त करण्यात आला असून त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी पत्रकारांसह विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवर उपस्थित होते, त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, भाऊ, भावजया, पुतणे असा परिवार आहे.