कुणकेश्वर यात्रा कालावधीत चिरेखाण व्यवसाय आणि वाहतूकवर बंदी

कुणकेश्वर यात्रा कालावधीत चिरेखाण व्यवसाय आणि वाहतूकवर बंदी

 

देवगड


         कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीदेव कुणकेश्वर यात्रेस महाराष्ट्र तसेच शेजारच्या राज्यांमधून मोठ्या संख्येने भाविक येतात. या वर्षी ही यात्रा २६ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार असून, त्यानंतरच्या सकाळपासून भाविकांचे पवित्र स्नान सुरू होईल.यात्रेच्या कालावधीत भाविकांना कोणतीही अडचण होऊ नये आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी तहसीलदार रमेश पवार यांनी देवगड तालुक्यातील चिरेखाण व्यावसायिकांची बैठक घेतली. या बैठकीत २६ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत चिरेखाण व्यवसाय आणि चिरेवाहतूक पूर्णतः बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.या बैठकीला देवगडमधील चिरेखाण व्यावसायिकांसह नायब तहसीलदार विवेक शेठ, श्रीकृष्ण ठाकूर, सुरेंद्र कांबळे उपस्थित होते.