रोझारिओ मित्र मंडळाच्या वतीने ३ मार्च रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन.

रोझारिओ मित्र मंडळाच्या वतीने ३ मार्च रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन.

वेंगुर्ला.

  रोझारिओ मित्र मंडळ उभादांडा आणि सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा वेंगुर्ला,यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हा रुग्णालय रक्तपेढी यांच्या सहकार्याने रविवार दि.०३ मार्च २०२४ रोजी सकाळी ९.०० वा.पूर्ण प्राथमिक शाळा नं २ उभादांडा सुखठणवाडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
      सद्यस्थितीत जिल्ह्यात रक्ताची असलेली गरज लक्षात घेऊन या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.रोझारिओ मित्रमंडळाचे हे ७ वे रक्तदान शिबीर आहे.तरी रक्तदान शिबिरास उपस्थित राहून इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य करावे.नावनोंदणी व अधिक माहितीसाठी आशू फर्नांडिस (८०१००३८४१६) पिटर ब्रिटो (८००७७७५१७५) यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन रोझारिओ मंडळाचे अध्यक्ष डिक्सन ब्रिटो आणि सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान,शाखा वेंगुर्ला चे अध्यक्ष ॲलिस्टर ब्रिटो यांच्या वतीने करण्यात आले आहे.