भाजपाच्या ‘गाव चलो अभियाना’ च्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारांची यशोगाथा तळागाळा पर्यंत पोहचवा : जिल्हा सहसंयोजक संजु परब. वेंगुर्ला येथे ‘गाव चलो अभियान’ बैठक संपन्न.

भाजपाच्या ‘गाव चलो अभियाना’ च्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारांची यशोगाथा तळागाळा पर्यंत पोहचवा : जिल्हा सहसंयोजक संजु परब.  वेंगुर्ला येथे ‘गाव चलो अभियान’ बैठक संपन्न.

वेंगुर्ला.

   २०१४ ते २०२४ या दहा वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशात सर्वच क्षेत्रात प्रचंड गतीने विकास केला.गरिब कल्याण, महीला सशक्तीकरण, देशातील अंतर्गत व बाह्य सुरक्षा अशा अनेक क्षेत्रात मोदी सरकारने मोठी कामगीरी करत आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव ऊंचावले आहे.आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकारच्या यशोगाथा तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन  " गाव चलो अभियान " चे जिल्हा सहसंयोजक सच्चिदानंद उर्फ संजु परब यांनी केले.
   वेंगुर्ले तालुक्याची " गाव चलो अभियाना " ची बैठक तालुका कार्यालयात भाजपा सावंतवाडी विधानसभा प्रमुख व मा.आम.राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती.यावेळी मान्यवर म्हणून सच्चिदानंद उर्फ संजु परब, प्रदेश का.का.सदस्य शरदजी चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई व अँड.सुषमा खानोलकर, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, वसंत तांडेल इत्यादी उपस्थित होते .
  यावेळी " गाव चलो अभियान " च्या वेंगुर्ले तालुका संयोजक म्हणून साईप्रसाद नाईक व सहसंयोजक म्हणून बाबली वायंगणकर व विष्णु उर्फ पपु परब यांची निवड करण्यात आली .
  यावेळी मार्गदर्शन करताना राजन तेली म्हणाले कि, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी " गाव चलो अभियान " सुरु करण्याचा आदेश दिलेला असून, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ४ ते ११ फेब्रुवारीपर्यंत हे अभियान राबवुन  जनतेचा विश्वास पुन्हा एकदा संपादन करायचा आहे. या अभियानात प्रत्येक बुथवर एक " प्रवासी कार्यकर्ता " आठवडाभर त्याला दिलेल्या बुथवर जाऊन लाभार्थ्यांशी संवाद, युवक - शेतकरी - व्यवसायीक यांच्या गाठीभेटी, प्रभावशाली व्यक्तींशी संवाद, विचार परिवारातील कार्यकर्त्यांच्या भेटी, स्वयंसेवी संस्था तसेच बचत गटातील महीला प्रतिनिधींशी भेट घेऊन व बुथ समीती व पन्ना प्रमुख यांना त्यांच्यावरील असलेल्या जबाबदाऱ्या सोपवुन प्रत्येक बुथवर ५१% पेक्षा अधिक मते मिळविन्याचे नियोजन करावे असे आवाहन केले.
    यावेळी या अभियानाच्या अनुषंगाने प्रत्येक पंचायत समिती निहाय बैठकांचे नियोजन करून, जबाबदारीचे वाटप करण्यात आले.
  यावेळी जिल्हा का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस, युवा जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद पाटकर, खानोली सरपंच सुभाष खानोलकर, अणसुर सरपंच सत्यविजय गावडे, मठ सरपंच रुपाली नाईक,  आसोली उपसरपंच संकेत धुरी, आरवली सरपंच समीर कांबळी, पालकरवाडी सरपंच बंड्या पाटील, मठ उपसरपंच बंटी गावडे, रेडी सरपंच रामसिंग राणे,आसोली सरपंच बाळा जाधव, युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रणव वायंगणकर, शक्तिकेंद्र प्रमुख सोमा मेस्त्री - सुधीर गावडे - सुनिल चव्हाण  - महादेव नाईक  - जगन्नाथ राणे, भुषण सारंग, प्रीतेश राऊळ, ता. चिटणीस नितीन चव्हाण व जयंत मोंडकर, दाजी परब, संदेश गावडे, सत्यवान पालव, बुथ प्रमुख नागेश सारंग, शंकर म्हेतर, नगरसेवीका श्रेया मयेकर, नगरसेवक प्रशांत आपटे, देवेंद्र वस्त, संदिप देसाई,अल्पसंख्याक सेलचे सायमन आल्मेडा, सोमनाथ टोमके उपस्थित होते.