वेंगुर्ले येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात कार्तिक एकादशी उत्सवाला उत्साहात प्रारंभ

वेंगुर्ले येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात कार्तिक एकादशी उत्सवाला उत्साहात प्रारंभ

 

वेंगुर्ले

 

      वेंगुर्ले माणिकचौक जवळ, बॅ. नाथ पै रोड येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात कार्तिक एकादशी उत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. पहाटे पुजा, अभिषेक आणि काकड आरती करून देवदर्शनाला प्रारंभ झाला. या उत्सवानिमित्त मंदिरात सलग चार दिवस नामवंत नाट्य कंपनीची दशावतारी नाटके आयोजित करण्यात आली आहेत.विठ्ठल भक्त मंडळ व रामेश्वर भक्त मंडळ, वेंगुर्ला आयोजित या उत्सवात शनिवारी पहिल्या दिवशी रात्री बाळकृष्ण गोरे पारंपारीक दशावतार नाट्यमंडळ कवठी, कुडाळ यांचा दशावतारी नाट्य प्रयोग सादर झाला. याला नाट्य रसिकांच्या उत्कृष्ट प्रतिसाद लाभला. यावेळी हे नाटक पुरस्कर्ते विवेक कुबल यांचा सत्कार मंडळाच्या वतीने करण्यात आला. यावेळी अनिल मांजरेकर, नितेश उर्फ बाबू सातार्डेकर, प्रसाद गुरव, जयंत हळदणकर, पंकज शिरसाट, बबलू कुडतरकर, चिन्मय हळदणकर, प्रथमेश यंदे, सागर वैद्य आदी यावेळी उपस्थित होते. दरम्यान आज सायंकाळी अचानक भजन मंडळ यांचे वारकरी भजन, त्यानंतर श्रींची पालखी प्रदिक्षिणा आणि रात्रौ ८.३० वा. दत्तमाऊली दशावतारी नाट्यमंडळ यांचा "वेसरोत्पत्ती" हा दणदणीत नाट्यप्रयोग होणार आहे. तर सोमवार ३ नोव्हेंबर रोजी सायं. ७.०० वा. अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळ म्हापण यांचा "लेक माझी तुळजाभवानी" हा नाट्यप्रयोग होणार आहे. आणि मंगळवार ४ नोव्हेंबर रोजी सायं. ७.०० वा. ओमकार नटेश्वर पारंपारीक दशावतारी नाट्यमंडळ, कालेली यांचा "गरुड नंदी संग्राम" हा नाट्य प्रयोग सादर होणार आहे. ही दोन्ही नाटके माजी नगराध्यक्ष श्री. संदेश निकम यांनी पुरस्कृत केली आहेत. तरी सर्व भाविकांनी या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक विठ्ठल भक्त मंडळ व रामेश्वर भक्त मंडळ, वेंगुर्ला यांनी केले आहे.