वेंगुर्ला येथिल रक्तदान शिबिरात 28 रक्तदात्यांनी केले रक्तदान.

वेंगुर्ला येथिल रक्तदान शिबिरात 28 रक्तदात्यांनी केले रक्तदान.


    आधार फाउंडेशन सिंधुदुर्ग व  वेंगुर्लेकर इंटिग्रेटेड हेल्थ अँड रिसर्च सेंटर वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला येथे महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात 28 रक्तदात्यांनी रक्तदान केले. महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषद महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. या परिषदेच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन सदर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 
        या रक्तदान शिबिरास तहसीलदार ओमकार ओतारी, मुख्याधिकारी पारितोष कंकाळ, मेडिकल असोसिएशन सदस्य डॉक्टर प्रल्हाद मणचेकर वेंगुर्ला,  वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संदीप सावंत, वेंगुर्ला मेडिकल असोसिएशन अध्यक्ष डॉक्टर राजेश्वर उबाळे, डॉक्टर लिलये तालुका आरोग्य अधिकारी  तसेच आधार फाउंडेशन अध्यक्ष माधुरी वेंगुर्लेकर, वंदन वेंगुर्लेकर, किरण वेंगुर्लेकर, नंदन वेंगुर्लेकर, कावेरी वेंगुर्लेकर, वैदही वेंगुर्लेकर, सगुण मातोंडकर, शामराव काळे, रमेश पिंगुळकर, जगदीश तिरपुडे, जयराम वायंगणकर, प्रकाश तेंडुलकर, प्रा डॉ गोलगट्टी, वामन गावडे, प्रज्ञा परब बाळू खामकर, वैभव पाटील, शिवराम आरोलकर, सुनील जाधव, महेश राऊत, ऍरिस्टर ब्रिटो, संजय गावडे, वाल्मिकी कुबल, वसंत तांडेल, राजाराम तांडेल, ॲड शैलेश नाबर, ॲड मनीष सातार्डेकर, समीर ओगले, जयवंत चूडनाईक उपस्थित होते.
      वेंगुर्ला शहरात तसेच संपूर्ण तालुक्यात रक्तपेढी नसल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत सावंतवाडी व ओरोस येथील रक्तपेढीवर स्थानिकांना अवलंबून राहावे लागते. वेळेत रक्त उपलब्ध न झाल्यामुळे अनेक विषयांना स्वतःचा जीव कामाला लागला आहे. भविष्यात वेंगुर्ला शहरात शासनमान्य स्वतंत्र रक्तपेढी सुरू व्हावी यासाठी सुद्धा आमच्या संस्थेमार्फत विशेष प्रयत्न व मोहीम राबविण्यात येणार आहे असे आधार फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्यावतीने सांगण्यात आले.