सावंतवाडी नायब तहसीलदार मनोज मुसळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन.
सावंतवाडी
सावंतवाडी प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार मनोज मुसळे ( वय ५५ रा. कणकवली ) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांना उपचारासाठी सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.आपल्या कार्यकाळात त्यांनी कणकवली, वैभववाडी, मालवण, कुडाळ येथे तहसीलदार कार्यालयामध्ये नायब तहसीलदार म्हणून जबाबदारी पार पाडली होती आणि आता सावंतवाडी येथे नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असताना त्यांचे आकस्मित निधन झाले त्यांचा निधनाने महसूल विभागासह सावंतवाडी आणि कणकवली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
konkansamwad 
