चौकुळात वाघाच्या बछड्याचे दर्शन....सह्याद्रीच्या जंगलपट्ट्यात पुन्हा वाघांचे अस्तित्व अधोरेखित!
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या जंगलपट्ट्यात पट्टेरी वाघांचे अस्तित्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे, सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ येथे रात्रीच्या सुमारास स्थानिक युवकांना चक्क वाघाच्या बछड्याचे दर्शन झाले, विशेष म्हणजे या बछड्याचे दृश्य युवकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे, गेळे गावचे सरपंच सागर ढोकरे यांनी याबाबत माहिती दिली, दरम्यान याबाबत सावंतवाडी वनविभागाचे अधिकारी वैभव बोराटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत दुजोरा दिला आहे, काही पर्यटकांना सुद्धा तो दोन-तीन दिवसापूर्वी दिसला होता, तो बछडा दीड ते दोन वर्षाचा आहे असे त्यांनी सांगितले, आंबोली-मांगेली या सह्याद्री पर्वतरांगांमध्ये यापूर्वी झालेल्या वन्यजीव सर्वेक्षणातून तब्बल १० ते ११ पट्टेरी वाघांचे अस्तित्व समोर आले होते, त्यातच आता चौकुळ परिसरात वाघाच्या बछड्याचे दर्शन झाल्याने या जंगलपट्ट्यात वाघांचे वास्तव्य आणि संभाव्य प्रजनन याबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
konkansamwad 
