लोकसभा विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी युवा मोर्चाने सज्ज व्हावे : डाॅ.अमेय देसाई. भाजपा युवा मोर्चा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष पदी प्रणव वायंगणकर यांच्या निवडीबद्दल सत्कार.

वेंगुर्ला.
भाजपा युवा मोर्चा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष पदी प्रणव वायंगणकर यांची निवड झाल्याबद्दल वेंगुर्ला तालुका कार्यालयात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपा वैद्यकीय आघाडीचे संयोजक डाॅ.अमेय देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना डाॅ.अमेय देसाई म्हणाले की, भारतीय जनता पार्टीचे आपण सर्व कार्यकर्ते नशीबवान आहोत. आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सारखा विश्वविख्यात लोकप्रिय नेता लाभला आहे. तसेच आपल्याला पक्षाचे मजबूत संघटन लाभले आहे आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे पक्षासाठी चांगल्या वाईट दोन्ही काळात तळमळीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची सोबत लाभली आहे. मोदीजींनी लोकसभा निवडणुकीत हॅटट्रिक करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.महाविजय २०२४ अशी आपली घोषणा आहे आपल्याला शक्य आहे. विजय दृष्टीपथात आहे, म्हणूनच युवकांनी सज्ज व्हावे.आता महत्वाची लढाई जिंकायची आहे . जनतेने मोदी यांना पुन्हा एकदा आशिर्वाद देण्याचे मत बनविले आहे.आपण जनतेचा आशिर्वाद मिळविण्यात कोठेही कमी पडायचे नाही.आपल्याला केंद्र सरकार व राज्य सरकार ने केलेली कामे जनतेला सांगायची आहेत व याची संपूर्ण जबाबदारी युवा मोर्चाची आहे.युवा मोर्चाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन तरुणांसमोरील बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने केलेले प्रयत्न तसेच तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्यापासुन त्यांच्या कौशल्यांना अनुरुप रोजगार संधी मिळवुन देण्यापर्यंत आणि नवउद्यमींना प्रोत्साहन देण्यापर्यंत सर्व स्तरावर सरकारने उचललेली पावले ही युवा वर्गापर्यंत पोहचवीणे हे युवा मोर्चाचे काम असल्याचे सांगीतले.
यावेळी प्रदेश का.का.सदस्य शरद चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, नगराध्यक्ष राजन गिरप, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष अशोक राणे, जेष्ठ कामगार नेते प्रकाश रेगे, जिल्हा उपाध्यक्ष अँड.सुषमा खानोलकर, महीला मोर्चा अध्यक्षा सुजाता पडवळ, जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस, महीला मोर्चा जि.उपाध्यक्षा वृंदा गवंडळकर, महीला शहर अध्यक्षा श्रेया मयेकर, शक्तिकेंद्र प्रमुख विजय बागकर, संदिप पाटील, हेमंत तुळसकर, बुथप्रमुख सुहास नवार, कामगार आघाडीचे प्रशांत नवार, ओबीसी सेल चे सुनिल मठकर, बाबली तुळसकर, रावजी राणे, रमेश झोटे, अशोक खराडे, राजन पडवळ, सचिन पेडणेकर व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.