सावंतवाडीत शोभायात्रेने हिंदू नववर्षाचे जल्लोषात स्वागत
सावंतवाडी
शहरात आज गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाचे स्वागत अत्यंत उत्साहात करण्यात आले. सकल हिंदू समाज सावंतवाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेत भाजप युवा नेते विशाल परब आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. वेदिका परब यांनी प्रत्यक्ष सहभागी होऊन नागरिकांचा उत्साह वाढवला. ऐतिहासिक राजवाड्यापासून सुरू झालेली ही यात्रा भगवे ध्वज आणि जय श्रीरामच्या जयघोषाने दुमदुमून गेली होती. पारंपारिक वेशभूषेतील नागरिकांनी यात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. शोभायात्रा नारायण मंदिर येथे पोहोचल्यावर महिलांनी सादर केलेल्या चित्तथरारक 'मर्दानी खेळांनी' सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तसेच वसंत शिशुवाटिका विद्याभारतीच्या लहान मुलांनी प्रभू श्रीरामावर आधारित सुंदर गीत सादर करून वातावरण भक्तीमय केले.यावेळी विशाल परब आणि सौ. वेदिका परब यांच्या हस्ते या चिमुकल्या कलाकारांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. अबालवृद्धांच्या अलोट गर्दीत पार पडलेल्या या सोहळ्याने सावंतवाडीत हिंदू संस्कृतीचे दर्शन घडवत नवीन वर्षाची दिमाखदार सुरुवात केली.

konkansamwad 
