'लाडकी बहिण’ योजनेनंतर आता लाडक्या भावांसाठीही योजना; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंढरपूरमध्ये घोषणा.

पंढरपूर.
लाडक्या बहिणींसाठी सरकारने योजना सुरू केल्यानंतर लाडक्या भावांसाठी देखील योजना सुरू करण्यात यावी, अशी मागणी होत होती. याच मागणीच्या पार्श्वभूमीवर आता सरकारने राज्यातील लाडक्या भावांसाठी एक विशेष योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका विशेष योजनेची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे, या योजनेअंतर्गत राज्यातील तरुण विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम दिली जाणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 6000, डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 8000 आणि पदवीधर विद्यार्थ्यांना 10 हजार रुपयांची रक्कम स्टायपंड म्हणून मिळणार आहे. मुख्यमंत्री म्हणाले कि, राज्यभरातील माझ्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये दरमहा जमा होतील. काही लोक म्हणाले लाडक्या बहिणीचं झालं, पण लाडक्या भावाचं काय? त्याचं काय तर त्यांच्यासाठीही आम्ही योजना सुरू केली आहे. त्यानुसार आता बारावी पास झालेल्यांना ६ हजार, डिप्लोमा झालेल्यांना ८ हजार आणि डिग्री पास करणाऱ्या विद्यार्थ्याला १० हजार रुपये महिन्याला स्टायपंड दिला जाणार आहे. त्यामध्ये, वर्षभर तो भाऊ कंपनीत काम करेल, त्याला अप्रेंटीस म्हणून ही रक्कम दिली जाणार आहे. त्या कंपनीत तो प्रशिक्षित होईल. अप्रेंटीशीपचे पैसे सरकार भरणार आहे, इतिहासात पहिल्यांदाच अशी योजना सुरू करण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. या महापूजेनंतर एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. या भाषणावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण या योजनेनंतर लाडक्या भावांसाठीही खास योजनेची घोषणा केली आहे. जो तरुण 12 वी उत्तीर्ण झाला असेल, त्याला दरमहा सहा हजार रुपये दिले जातील. तर डिप्लोमा केलेल्या तरुणाला आठ हजार रुपये मिळतील. तसेच पदवीधर तरुणाला 10 हजार रुपये महिन्याला दिले जातील. हा तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेन्टिसशिप करेल. त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळेल. एक प्रकारे आपण स्कील्ड मॅनपावर (कुशल कामगार) तयार करत आहोत. राज्यसह देशातील उद्योग जगताला कुशल तरुण पुरवणार आहोत. आपले तरुण त्यांच्या कामात कुशल व्हावेत, यासाठी सरकार पैसे भरणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.