श्री गणेश कृपा कलाक्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.

कणकवली.
महिन्याच्या सुरुवातीला कसवण शाळा नंबर एक मध्ये श्री गणेश कृपा कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कसवण गावकरवाडीच्या वतीने शाळेतील सर्व 44 विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक छत्री व वह्यांचे वाटप करण्यात आले या कामी श्री विष्णु सातवसे उद्योजक, महेश वाळके गजानन महाजन(सर्व कणकवली) तसेच गणेश मूर्तिकार श्री विलास गोलतकर क्रिकेट समालोचक वागदे यांचे सुद्धा मोलाचे सहकार्य लाभले उद्योगपती श्री सातवसे व अन्य पाहुण्यांचे,मंडळाचे अध्यक्ष श्री विलास गावकर यांनी पुष्पगुच्छ शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले.
आपले मनोगत व्यक्त करताना शिक्षक व विद्यार्थ्यांनी चा प्रतिसाद पा बघून आपण पुढील वर्षी हे शाळा डिजिटल करणार असून विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेचे नाव उज्वल करावे असे प्रोत्साहित केले.श्री विलास गावकर यांनी पाहुण्यांचे स्वागत करताना आपणासारख्या दानशूर व समाज प्रेमी व्यक्तीमुळे समाजाची प्रगती होते निर्व्यसनी व सुसंस्कृत समाज घडतो असे प्रतिपादन केले तसेच विद्यार्थ्यांनी जोमाने अभ्यास करून तांत्रिक शिक्षक तसेच कलाक्रीडा प्रकारात प्रगती करून आपल्या शाळेचे नाव उज्वल करावे असे आवाहन केले यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री विलास गावकर शालेय शिक्षण समिती अध्यक्ष श्री विजय गावकर संतोष गावकर समीर गावकर जीवन आधार संस्थेचे श्री श्यामसुंदर उर्फ बंड्या मालडंकर उपस्थित होते तसेच मुख्याध्यापक श्री गोसावी ताम्हाणेकर, हिर्लेकर मॅडम तसेच बहुसंख्येने पालक उपस्थित होते श्री ताम्हानेकर गुरुजी यांनी सर्वांचे आभार मानले.