मंत्री दिपक केसरकर यांच्या माध्यामातून डेगवे गावातील विविध रस्त्यांच्या कामांना मंजुरी.

मंत्री दिपक केसरकर यांच्या माध्यामातून डेगवे गावातील विविध रस्त्यांच्या कामांना मंजुरी.

सावंतवाडी 

  शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या माध्यामातून सावंतवाडी तालुक्यातील डेगवे गावातील रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.माजी सरपंच वैदेही देसाई, उपाध्यक्ष मंगलदास देसाई, माजी चेअरमन सुनिल देसाई,शाखाप्रमुख अनिल देसाई, सीताराम देसाई,योगेश मांजरेकर,गौरी देसाई,रुपाली देसाई तसेच  ग्रामपंचायत सदस्य विजय देसाई यांनी या विकास कामांच्या अंमलबजावणी साठी विशेष प्रयत्न केले  होते. या कामात डेगवे हरिजनवाडी ते श्रीधर देसाई यांचा घरा पर्यंत रू.५ लाख,डेगवे आंबेखण दलित वस्ती ते ई.जी.मा.६३ ला जोडणारा रस्ता रू. २० लाख,डेगवे आंबेखणवाडी ते प्रकाश देसाई यांचा घरा पर्यंत जाणारा रस्ता रू.७ लाख,डेगवे आंबेखणवाडी भोमभरड रस्ता रू.८ लाख,डेगवे मिरेखणवाडी रस्ता  रू.१० लाख,डेगवे मिरेखणवाडी १ किमी च्या पुढचा रस्ता रू.५ लाख डेगवे होळीचे खुंट ते तांबोळी रस्ता रू. ७ लाख अशा विविध रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.