सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात लवकरच मिळणार सिटी स्कॅन मशीन सुविधा. जीवनरक्षा प्रतिष्ठान अध्यक्ष राजु मसुरकर यांच्या पाठपुराव्याला यश; पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडुन मंजूरी.
सावंतवाडी.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सिटी स्कॅन मशीन सुविधा कृष्णा प्रायव्हेट ली. कंपनी पुणेच्या मार्फत येत्या फेब्रुवारी मध्ये सुरु होणार आहे. मशिनरी बसविण्याचे काम युद्धपातळीवर चालू असून रुग्णांना आता शासनाकडून मोफत सिटी स्कॅन तपासणी सुविधा उपलब्ध होणार आहे. सदरची मशिनरी जीवनरक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजु मसुरकर यांचे निवेदन व पाठपुराव्यानुसार पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कडुन मंजूर करण्यात आली.
जीवनरक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजु मसुरकर यांनी उपजिल्हा रुग्णालयाला सदिच्छा भेट देऊन पाहणी केली. यावेळी प्रवीण टोपले, सुनील कोरगावकर, संजय डुबळे आदी उपस्थित होते. सिटी स्कॅन मशीन सावंतवाडी, कणकवली उपजिल्हा रुग्णालयामध्ये बसविण्यात येणार आहे. तसेच, एमआरआय मशिनरी ओरोस रुग्णालयामध्ये या कंपनी मार्फत बसविण्यात येणार आहे.