कुडाळ नगरपंचायतीच्या सांगिर्डेवाडी कचरा डेपोला आग

कुडाळ नगरपंचायतीच्या सांगिर्डेवाडी कचरा डेपोला आग

कुडाळ

 

      कुडाळ नगरपंचायतीच्या सांगिर्डेवाडी येथील कचरा डेपोला काल आग लागली. कचऱ्याने अचानक पेट घेतल्याने बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले. कडक ऊन आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आगीच्या ज्वाला वेगाने पसरल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.घटनेची माहिती मिळताच कुडाळ नगरपंचायत प्रशासनाने तातडीने सूत्रे हलवत अग्निशमन बंबासह घटनास्थळी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून पाण्याचा जोरदार मारा सुरू करण्यात आला.नगरपंचायतीच्या अग्निशमन बंबाने तब्बल चार ते पाच फेऱ्या मारून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी तातडीने अतिरिक्त पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला.पालिका कर्मचारी आणि अग्निशमन दलाकडून सायंकाळपर्यंत आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.