श्री सद्गुरू नारायण महाराज श्रीगोंदेकर दिंडी सोहळ्याला वेंगुर्लेतून प्रारंभ....वेंगुर्ला ते पंढरपूर पायी वारीसाठी वारकरी सज्ज

श्री सद्गुरू नारायण महाराज श्रीगोंदेकर दिंडी सोहळ्याला वेंगुर्लेतून प्रारंभ....वेंगुर्ला ते पंढरपूर पायी वारीसाठी वारकरी सज्ज

वेंगुर्ला 


     श्री सद्गुरू नारायण महाराज श्रीगोंदेकर दिंडी सोहळ्याला वेंगुर्लेतून भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला.यानिमित्ताने वारकऱ्यांनी वेंगुर्ला दाभोली नाका येथे वारकरी भजन केले. टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात परिसर दुमदुमून गेला होता. वेंगुर्ला दाभोली नाका पासून बाजारातून हॉस्पिटल नाका मार्गे ही दिंडी पंढरपूरचा पायी प्रवास करणार आहे.मध्ये मध्ये थांबा घेत ही दिंडी पंढरपूरला जाणार असल्याचे सांगण्यात आले. वाटेत ठिकठिकाणी भाविकांकडून दिंडीचे स्वागत आणि वारकऱ्यांची सेवा केली जाणार आहे.गेली ५० वर्षांची परंपरा असलेली ही वारकरी दिंडी आपल्या पंढरपूरच्या प्रवासाला सुरुवात करत आहे. पाच दशकांची अखंड परंपरा जपत वेंगुर्ल्यातील वारकरी दरवर्षी श्रद्धेने पंढरपूर वारी करतात. यंदाही मोठ्या संख्येने वारकरी या पायी वारीत सहभागी झाले असून, विठ्ठल दर्शनाची ओढ घेऊन त्यांनी वाटचाल सुरू केली आहे.