सावंतवाडी येथील जगन्नाथराव भोसले उद्यानात रंगणार भव्य 'नरकासुर स्पर्धा'.....आयोजकांचे सहभागाचे आवाहन
सावंतवाडी
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने हितेन नाईक यांच्या आयोजनातून सावंतवाडी येथे 'खुली नरकासुर स्पर्धा २०२६' चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 'खुला गट' आणि 'बालगट' अशा दोन वेगवेगळ्या गटांमध्ये पार पडणार असून दोन्ही गटांतील विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. या स्पर्धेत खुल्या गटातील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला ५७ हजार ५७ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी २५ हजार ५७ रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी १० हजार ५७ रुपये असे रोख पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय उत्तेजनार्थ तीन विजेत्यांना प्रत्येकी ५ हजार ५७ रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. तर बालगटात प्रथम क्रमांकासाठी १० हजार ५७ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ७ हजार ५७ रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ५ हजार ५७ रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. ही स्पर्धा सावंतवाडी येथील जगन्नाथराव भोसले उद्यान येथे पार पडणार आहे. या भव्य आयोजनासाठी उद्योजक विनोद राऊळ, सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर, भाजपा युवा मोर्चा सावंतवाडी मंडाळ अध्यक्ष हितेन नाईक तसेच युवा नेते विशाल प्रभाकर परब यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी हितेन नाईक (८२९१४९४८९७) किंवा पंकज (९१३०६८३४७२) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
konkansamwad 
