कुणकेश्वर मंदिर परिसरातून १५,३३० किलो कचरा जमा

कुणकेश्वर मंदिर परिसरातून १५,३३० किलो कचरा जमा

 

देवगड


      डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने कुणकेश्वर मंदिर व परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. स्वच्छता अभियानांतर्गत ओला कचरा 6,210 किलो व सुका कचरा 9,120 किलो असा एकूण 15, 330 किलो कचरा जमा केला.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदांडा अलिबाग यांच्यावतीने पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व रायगड भूषण डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री बैठकीच्या माध्यमातून सामाजिक व पर्यावरणपूरक असे विविध उपक्रम जिल्हा, राज्य तसेच देशपातळीवर राबविले जातात. यापैकीच स्वच्छता अभियान उपक्रमांतर्गत प्रतिष्ठानतर्फे 2 मार्च रोजी सकाळी 8.30 ते 12.10 या वेळेत देवगड तालुक्यातील श्री बैठकीमधील 421 श्री सदस्यांनी एकत्र येवून कुणकेश्वर मंदिर व परिसरात स्वच्छता अभियान राबविले .कार्यक्रमासाठी संपूर्ण तालुक्यातील 5 श्री बैठकांनी (जामसंडे, वाडा, मुटाट, दहिबांव, शिरगाव) सहभाग घेतला होता. या उपक्रमादरम्यान तहसीलदार रमेश पवार, माजी आ.अॅड. अजित गोगटे, पोलिस उपनिरीक्षक महेश देसाई, कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष एकनाथ तेली, सरपंच महेश ताम्हणकर, माजी सरपंच चंद्रकांत घाडी आणि प्रशासनातील अधिकारी, लोकप्रतिनिधी व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.