देवरूख कनिष्ठ महाविदयालयात देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा संपन्न.

देवरूख कनिष्ठ महाविदयालयात देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा संपन्न.

रत्नागिरी.

  देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद‌यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागामार्फत देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित विद्यार्थी, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी भारत‌मातेचे व सरस्वती पूजन केले. यानंतर कार्यक्रमाचे  उद्‌घाटन पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे यांनी करून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.  
    
स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी गट पुढीलप्रमाणे-

प्रथम क्रमांक- वैभवी चव्हाण आणि सहकारी                                  (१२वी संयुक्त).द्वितीय क्रमांक (विभागून)- सई नर आणि सहकारी (१२वी वाणिज्य-ब).सानिका पांगळे आणि सहकारी(१२वी वाणिज्य-ब).तृतीय क्रमांक - गौरी शिगवण आणि सहकारी (१२वी कला). उत्तेजनार्थ (विभागून) - धनश्री कांबळे आणि सहकारी (११वी संयुक्त).रसिका पवार आणि  सहकारी (११वी वाणिज्य).
    कनिष्ठ महाविद्यालयातील १६ संघानी या समूहगीत गायन स्पर्धेत सहभाग घेतला होता.या स्पर्धेसाठी गोरक्ष जागुष्टे याने मृदुंग, रोहन गोताड याने ढोलकीची, चिराग पवार व हार्दिक घवाळी यांनी पेटीची, तर अथर्व कदम व प्रणव लिंगायत यांनी तबल्याची साथ दिली. स्पर्धेचे परीक्षण प्रा. संदीप मुळ्ये व प्रा. सानिका भालेकर यांनी केले. प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी सर्व उपस्थिताना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात स्वातंत्र्य ही सर्वांगीण विकासाची सोनेरी गुरुकिल्ली असल्याचे नमूद करताना, भारताने १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळवले आणि गेल्या ७७ वर्षात विकास व प्रगतीची केलेली घोडदौड विशद केली.
   विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करताना कोणतीही कला वृद्धिंगत करताना त्यामध्ये आपले सर्वस्व अर्पण करण्याचे आवाहन  याप्रसंगी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सीमा शेट्ये, प्रा. सीमा कोरे, प्रा.स्वप्नाली झेपले, प्रा. देवयानी जोशी, प्रा.संचिता चाळके, प्रा.संदीप मुळ्ये, प्रा.प्रविण जोशी, प्रा.सुनिल वैदय, प्रा.मयुरेश राणे, प्रा. अभिनव पातेरे, प्रा.शिवराज कांबळे व सहाय्यक अमोल वेलवणकर यांनी मेहनत घेतली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.स्वप्नाली झेपले यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.सीमा शेट्ये यांनी मानले.