माजी आमदार राजन तेली यांनी हाती घेतल धनुष्यबाण.......उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश
मुंबई
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार राजन तेली यांनी आज मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेशाचा कार्यक्रम झाला. यावेळी शिंदे यांच्या माध्यमातून त्यांचे स्वागत करण्यात आले. श्री. तेलींनी दसरा मेळाव्याच्या दिवशी ठाकरे शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना "जय महाराष्ट्र" केले आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपमधून ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र त्या ठिकाणी त्यांना निवडणुकीत अपयश आले. त्यानंतर ते गेले काही दिवस राजकीय अज्ञातवासात होते. ते नेमके काय करतील? याबाबत प्रश्नचिन्ह होते. परंतु आज त्यांनी पुन्हा एकदा शिंदे शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

konkansamwad 
