वेंगुर्ला बंदरावर नारळी पौर्णिमा उत्साहात.
वेंगुर्ला.
वेंगुर्ला बंदरावर नारळी पौर्णिमा सण आज उत्साहात साजरा करण्यात आला.शहरातील नागरिकांसह वेंगुर्ला पोलिस ठाणे, पत्रकार समिती, लोकप्रतिनिधी, व्यापारी यांनी वेंगुर्ला बंदर येथे समुद्राला नारळ अर्पण केला.यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.वेंगुर्ला पोलिस ठाण्याच्या वतीने पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी विधिवत पूजा करून नारळ समुद्राला अर्पण केला.
यावेळी सहायक पोलिस निरीक्षक विद्या जाधव, सहायक पोलीस उपनिरीक्षक वासुदेव परब,पोलीस कर्मचारी योगेश वेंगुर्लेकर, सुरेश पाटील, प्रथमेश पालकर, मनोज परुळेकर, बंटी सावंत, बंड्या धुरी, अमर कांडर, गौरव परब, सखाराम परब, महिला कॉन्स्टेबल प्रज्ञा पालकर, पूजा भाटे, प्रतीक्षा कोरगावकर, दीपा धुरी तसेच पत्रकार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शहरातील नागरिकांनीही समुद्राला नारळ अर्पण केला.