मुंबई शहर जिल्हास्तरीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धा २०२६-२७ उत्साहात संपन्न!
मुंबई
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांच्या आयोजनातून तसेच स्पोर्ट्स किकबॉक्सिंग असोसिएशन, मुंबई शहर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेली जिल्हास्तरीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धा २०२६-२७ ही स्पर्धा दि. १३ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, धारावी, मुंबई येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली, या स्पर्धेमध्ये मुंबई शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांतील खेळाडूंनी सहभाग घेत आपल्या क्रीडाकौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले, WAKO किकबॉक्सिंगच्या लाईट कॉन्टॅक्ट प्रकारात मुलांच्या व मुलींच्या विविध वजनगटांमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या, स्पर्धेच्या उद्घाटन व आयोजनप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर श्रीमती नीलिमा अडसूळ आणि क्रीडा कार्यकारी अधिकारी श्री. निलेश गराटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली, स्पोर्ट्स किकबॉक्सिंग असोसिएशन मुंबई शहरचे अध्यक्ष उमेश मुरकर यांनी संपूर्ण स्पर्धेचे नियोजन, व्यवस्थापन व समन्वय अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने सांभाळला, त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेची सर्व व्यवस्था शिस्तबद्ध व नियोजनबद्ध रीतीने पार पडली, स्पर्धेचे तांत्रिक व पंचकामकाज आंतरराष्ट्रीय वाको किकबॉक्सिंग रेफरी विघ्नेश मुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले, त्यांना राहुल साळुंखे, विन्स पाटील, आशिष महाडिक, भूपेश वैती, अनुप्रिता घाग, सांप्रती पाटील, अश्विनी जांबले, कशीस जैसवार, हर्ष सालेकर आणि साहिल बापेरकर यांनी पंच म्हणून मोलाची साथ दिली, स्पर्धेच्या तांत्रिक व्यवस्थापनाची जबाबदारी सचिन वाडकर यांनी सांभाळली, पंच, तांत्रिक अधिकारी आणि आयोजन समितीच्या समन्वयामुळे स्पर्धा सुरळीत पार पडली, स्पर्धेतील विजेते खेळाडू - प्रथम क्रमांकाचे विजेते - शिधत गुप्ता – २८ किलो – डॉन बॉस्को हायस्कूल, सिद्धेश आगवणे – ३७ किलो – साधना विद्यालय, अंश निर्मल – ४७ किलो – श्रीवल्लभ आश्रम स्कूल, आयुष्य माने – ५७ किलो – पीपल्स वेल्फेअर सोसायटीज हायस्कूल, ग्रिशम पटवर्धन – ४० किलो – व्ही. एन. सुळे गुरुजी शाळा, साई साळेकर – ४५ किलो – डॉ. अँटोनिओ द सिल्वा हायस्कूल, ध्रुव पालव – ५० किलो – विल्सन कॉलेज, यथार्थ बुडमाला – ६० किलो – जय हिंद कॉलेज, सान्वी कारंडे – ३७ किलो – शिव शिक्षण संस्था सेकंडरी स्कूल, माही पायेलकर – ५० किलोपेक्षा अधिक – पीपल्स वेल्फेअर सोसायटीज हायस्कूल, निधी विश्वकर्मा – ५० किलो – महर्षी दयानंद कॉलेज, दुर्वा मिथुन गावडे – ५७ किलो – महर्षी दयानंद कॉलेज, द्वितीय क्रमांकाचे विजेते - सावीर पालये – ५५ किलो – सेंट पॉल हायस्कूल, श्रेयांक मौर्या – ४५ किलो – श्रीवल्लभ आश्रम स्कूल, शिवांक मौर्या – ७५ किलो – श्रीवल्लभ आश्रम स्कूल, सनिधी कारंडे – ५० किलोपेक्षा अधिक – शिव शिक्षण संस्था सेकंडरी स्कूल, इंग्लिश मीडियम, तृतीय क्रमांकाचे विजेते - मानित जाधव – ७५ किलो – डॉन बॉस्को हायस्कूल, हितांशु कुडे – ५० किलो – डी. एस. हायस्कूल, गणेश ठाकूर – ६० किलो – साधना विद्यालय, नंदराज कराळे – ६० किलो – डी. एस. हायस्कूल, सार्थक काळे – ७० किलो – पीपल्स वेल्फेअर सोसायटीज हायस्कूल, अदिती देसाई – ६० किलो – आय. ई. एस. व्ही. एन. सुळे गुरुजी शाळा, शमिका शिंदे – ६० किलोपेक्षा अधिक – मुंबई पब्लिक स्कूल.
konkansamwad 
