खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे अमृत महोत्सवी वर्ष ठरणार यादगार
कणकवली
दिनांक १० एप्रिल रोजी अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळा साजरा होणार मान्यवरांच्या उपस्थितीत संपूर्ण वर्षभराच्या कार्यक्रमांनी पुढील वर्षी साजरा होणार अमृत महोत्सवी वाढदिवस. कोकणाचे भाग्यविधाते, माजी मुख्यमंत्री तथा भाजपा खासदार नारायण राणे यांचा दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी ७४ वा वाढदिवस असून ते अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत या पार्श्वभूमीवर जिल्हावासियांनी अमृत महोत्सवी वर्ष स्वागत समिती स्थापन केलेली असून समितीतर्फे ७४ व्या वाढदिवसापासून अमृत महोत्सव अर्थात ७५ व्या वाढदिवसापर्यंत वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येणार असून हे अमृत महोत्सवी वर्ष यादगार बनविण्याचे निश्चित केलेले आहे.१० एप्रिल रोजी सायंकाळी जिल्हा उप रुग्णालय कणकवली समोरील पटांगणावर राज्यातील अनेक मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत नारायण राणे यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे.सदर कार्यक्रमानंतर लगेच प्रसिद्ध गायक सोनू निगम यांचा लाईव्ह गायनाचा कार्यक्रम होणार आहे.या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, हितचिंतक तसेच समस्त जिल्हावासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन स्वागत समितीकडून करण्यात येत आहे. यावेळी श्री. राणे यांना शुभेच्छा देताना पुष्पगुच्छ ऐवजी पुस्तक स्वरूपात भेट स्वीकारण्याचा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे.जेणेकरून भेटीद्वारे संकलित पुस्तकांचे वितरण जिल्ह्यातील ग्रंथालयांना करण्यात येवून जिल्ह्यात वाचक चळवळ वृद्धिंगत होण्यास हातभार लागेल. या वाढदिवसापासून दिनांक १० एप्रिल २०२७ पर्यंत वर्षभर विविध सामाजिक उपक्रम या अमृत महोत्सवी वर्ष स्वागत समिती तर्फे राबविण्यात येणार आहेत.अशाप्रकारे ज्या नेत्याने आपले संपूर्ण आयुष्य कोकणवासीय जनतेच्या कल्याणकरिता समर्पित केले त्या समर्पणाचा यथोचित गौरव या निमित्ताने करण्याची संधी जिल्हवासियांना प्राप्त झालेली आहे.तरी दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी जिल्हावासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अमृत महोत्सवी वर्ष स्वागत समितीतर्फे करण्यात आलेले आहे.
konkansamwad 
