जिल्हा परिषद समिती सभापती पदांसाठी २५ मार्चला निवडणूक
सिंधुदुर्गनगरी
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या विद्यमान सदस्यांमधून सभापती, समाज कल्याण समिती- एक पद, सभापती, महिला व बालकल्याण समिती- एक पद व विषय समिती सभापती-दोन पदांचे निवडणूकीसाठी श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, जिल्हा परिषद कार्यालय, सिंधुदुर्ग येथे २५ मार्चला दुपारी ३ वाजता बैठक आयोजित करुन निवडणूक घेण्यात येणार अल्याची माहिती जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली आहे. विद्यमान जिल्हा परिषद सदस्य तसेच विद्यमान पंचायत समिती सभापती यांना या सभेस उपस्थित रहाणेबाबत या कार्यालयाकडून दि. १८ मार्चला नोटीसा उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यामार्फत पाठविण्यात आलेल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद विद्यमान सदस्य आणि विद्यमान पंचायत समिती सभापती यांनी श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, जिल्हा परिषद कार्यालय सिंधुदुर्ग येथे २५ मार्चला सभापती, समाज कल्याण समिती एक पद, सभापती, महिला व बालकल्याण समिती- एक पद आणि विषय समिती सभापती- दोन पदांचे निवडीच्या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे.

konkansamwad 
