प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन.

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन.

सिंधुदुर्ग.

   प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत दि.30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2023 या कालावधीत विशेष नोंदणी अभियान (पंजीकरण अभियान) राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र महिलांनी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी केले आहे.
    माता व बालकांच्या आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती माता व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करणे, त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुधारावे, मातामृत्यु दरात घट होऊन तो नियंत्रित राहावा, यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरु केले आहे.
    योजनेचा जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2023 या कालावधीत ऑनलाईन लाभार्थी नोंदणीसाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. मिशन शक्तीच्या मार्गदर्शक सुचनेनुसार राज्यात प्रधानमंत्री मातृवंदना 2.0 पोर्टल सुरु झालेले आहे. या योजनेचा  लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि  उपकेंद्राअंतर्गत 30 नोव्हेबर ते 1 डिसेंबर 2023  या कालावधी ऑनलाईन लाभार्थी नोंदणी अभियायन राबविण्यात येणार आहे.
    प्रधानमंत्री मातृवंदना योजना शहरी व ग्रामीण भागामध्ये लागु करण्यात आली असून या योजनेंतर्गत शासनाने अधिसुचित केलेल्या संस्थेत शहरी नोंदणी केली असेल अशाच पात्र महिलांना या योजनेचा लाभ पहिल्या जिवित अपत्यासाठी रु. 5 हजार दोन टप्प्यात ऑनलाईन पध्दतीने लाभार्थीच्या बँक खातेवर देण्यात येतो. तसेच  1 एप्रिल 2022 नंतर दुसरे अपत्य मुलगी असल्यास रु. 6 हजार चा लाभ ऑनलाईन पध्दतीने लाभार्थ्यांच्या बँक खातेवर देण्यात येतो. ही योजना शासकीय  सेवेत असणाऱ्या माता वगळुन इतर सर्व मातांना देय आहे. यात सहभागासाठी  काही अटी असून त्या पुर्ण करणाऱ्या माताचा सहभाग योजनेत केला जातो.
    लाभ, पहिले अपत्य, पहिला हप्ता, मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून 6 महिन्यांच्या आत राज्य शासनाकडून मान्यता प्राप्त आरोग्य संस्थामध्ये गरोदरपणांची नोंदणी आणि किमान एक प्रसुती पूर्व तपासणी करुन घेणे आवश्यक आहे. रक्कम रु. 3000/-
   दुसरा हप्ता, जन्म नोंदणी प्रमाणपत्र, बालकास बीसीजी, ओपीव्ही, डीपीटी, आयपीव्ही आणि हिपॅटायटीसबी च्या मात्रा अथवा समतुल्य लसीकरण (प्राथमिक लसीकरण चक्र पुर्ण) करणे आवश्यक आहे. रक्कम रु. 2000/-
    दुसरे अपत्य (मुलगी असल्यास), एक हप्ता, बाळाच्या जन्मांतर (जर एखाद्या लाभार्थीस तिच्या दुसऱ्या गरोदरपणात एकापेक्षा जास्त  जुळे/ तिळे/ चार, अपत्य झाली असतील व त्यामध्ये एक किंवा अधिक मुली असतील तर तिला PMMVY 2.0 नियमांनुसार दुसऱ्या मुलीसाठीचा लाभ मिळेल.) रक्कम रु. 6000/-
    योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (कोणत्याही एका ओळखपत्राच्या पुराव्याची प्रत जोडणेबाबत)
   ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न प्रतिवर्ष रु. 8 लाख पेक्षा कमी आहे.  अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या  महिला. ज्या महिला अंशत: (40 टक्के) किंवा पूर्ण अपंग आहेत (दिव्यांग जन). बीपीएल शिधापत्रिकाधारक महिला. आयुष्यमान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत महिला लाभार्थी ई- श्रम कार्ड धारण करणाऱ्या महिला. किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी . मनरेगा जॉब कार्ड घेतलेल्या महिला. गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या अंगणवाडी सेविका (AWW) अंगणवाडी मदतनीस (AWHs) अशा कार्यकर्ती (ASHAs).
    जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र महिलांनी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी यांच्याकडून करण्यात येत आहे.