पाट देसाईवाडा येथील साकवाच्या कामाला गती....जि. प. माजी उपाध्यक्ष रणजीत देसाई यांच्याकडून पाहणी

पाट देसाईवाडा येथील साकवाच्या कामाला गती....जि. प. माजी उपाध्यक्ष रणजीत देसाई यांच्याकडून पाहणी

म्हापण

 

  कुडाळ तालुक्यातील पाट देसाईवाडा येथील साकवाच्या कामाला गती मिळाली आहे. येथील बांधकामाची नुकतीच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी पाहणी केली.पाट देसाईवाडा साकव कामाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी ग्रामस्थांच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला होता. लवकरच ही मागणी पूर्ण होणार असून  बांधकाम जलदगतीने केल्याबद्दल ठेकेदार व त्यांना सहकार्य करणाऱ्या ॲड. दिगंबर देसाई यांचे ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले. यावेळी माजी सरपंच समाधान परब, माजी उपसरपंच पुंडलिक पेडणेकर, पाट हायस्कूलचे शिक्षक सुधीर प्रभू देसाई उपस्थित होते.