कणकवलीत ७ जून रोजी सुपारी लागवड कार्यशाळा.....३१ मे पर्यंत नोंदणी करणाऱ्यांना विशेष सवलत

कणकवलीत ७ जून रोजी सुपारी लागवड कार्यशाळा.....३१ मे पर्यंत नोंदणी करणाऱ्यांना विशेष सवलत

कणकवली

 

       सुपारी लागवडीतून अधिक उत्पन्न व दीर्घकालीन नफा मिळवू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने रविवार, दिनांक 7 जून 2026 रोजी कणकवली येथे 'सुपारी लागवड कार्यशाळा' आयोजित करण्यात आली आहे.ही कार्यशाळा सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत कणकवली येथे होणार आहे. कार्यशाळेसाठी प्रशिक्षण शुल्क 500 रुपये निश्चित करण्यात आले आहे. मात्र 31 मे 2026 पर्यंत नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विशेष ऑफर म्हणून केवळ 350 रुपयांत प्रवेश देण्यात येणार आहे. मर्यादित जागा असल्याने इच्छुकांनी आगाऊ नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी 9145428338 या मोबाईल नंबरवर APW असा व्हॉट्सॲप मेसेज पाठवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे."आता सुपारी लागवड करून मिळवा अधिक उत्पन्न आणि दीर्घकालीन नफा. आपला शेती व्यवसाय यशस्वी करण्यासाठी आजच पाऊल उचला," असे आवाहन संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. सुपारी पिकातून शाश्वत उत्पन्नाचे मार्गदर्शन या कार्यशाळेतून मिळणार असल्याने शेतकऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे.