सावंतवाडीत भव्य महाआरोग्य शिबिर.....गरजू रुग्णांना मोफत उपचार व चष्मे-वॉकरचे वाटप

सावंतवाडीत भव्य महाआरोग्य शिबिर.....गरजू रुग्णांना मोफत उपचार व चष्मे-वॉकरचे वाटप

सावंतवाडी

       सेवा संकल्प अभियानाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी भाजप आणि युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून सावंतवाडीतील जिमखाना मैदान (स्वार हॉस्पिटलसमोर) येथे सकाळी १० वाजता 'महाआरोग्य शिबिराचे' आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, संपर्क मंत्री सदानंद शेठ तानावडे व इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार असून, यात बेळगाव येथील केएलई रुग्णालय आणि कोल्हापूर येथील रुग्णालयांमधील १२ हून अधिक विभागांतील तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करणार आहेत. या शिबिरात नेत्ररोग, हृदयरोग, अस्थिरोग, बालरोग, स्त्रीरोग यांसह विविध आजारांवर उपचार केले जातील. तसेच तपासणीनंतर गरजेनुसार पुढील ८ दिवसांत चष्मे, तर ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना वॉकर किंवा काठीचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व इतर शासकीय योजनांचे मार्गदर्शन करून शिबिरानंतरही वर्षभर रुग्णांचा पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती भाजप प्रवक्ते सिद्धार्थ भांबुरे यांनी दिली असून जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.