भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे उद्या सिंधुदुर्गात......निवडणूक आढावा बैठकीसह युतीबाबत होणार चर्चा

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे उद्या सिंधुदुर्गात......निवडणूक आढावा बैठकीसह युतीबाबत होणार चर्चा

 

सावंतवाडी

 

    आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका, नगरपंचायत निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे ५ नोव्हेंबरला जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यादिवशी सायंकाळी ४ वाजता भाजपा जनसंपर्क कार्यालय सावंतवाडी, शिरोडा नाका येथे निवडणूक आढावा बैठका संपन्न होणार आहेत.जिल्ह्यातील ५० जिल्हा परिषद १०० पंचायत समिती गण आणि कणकवली, मालवण, वेंगुर्ले आणि सावंतवाडी या नगरपालिका, नगरपंचायत यांच्या निवडणुका संदर्भात भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक तयारीचा विस्तृत आढावा घेणार आहेत. आढावा बैठकीला जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, प्रमोद जठार, संघटनमंत्री शैलेंद्र दळवी यांच्यासह भाजपा जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष आणि निवडणूक प्रभारी उपस्थित राहणार आहेत.या आढावा बैठकीच्या निमित्ताने युतीबाबत देखील महत्वपूर्ण चर्चा होणार आहे. तसेच पक्ष प्रवेश देखील होणार आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष आणि पालकमंत्री यांच्या उपस्थितीत संपन्न होणारी ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे.